आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मारहाण
मारहाण

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे पतीच्या त्रासाला कंटाळून आलेल्या पत्नीला पतीकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी अंजली आप्पासाहेब इंगळे(वय.३०) रा. शहापूर या काही दिवसांपूर्वी घोडेगाव येथील आपल्या माहेरी आल्या होत्या. दि. २७ रोजी आरोपी आप्पासाहेब रामकिसन इंगळे (पती) रा. शहापूर हा आपल्या घोडेगाव येथील सासुरवडीला पत्नीला घेण्यासाठी आला होता. तो तिस माझ्या सोबत चल असा आग्रह करत होता.

मारहाण

परंतु फिर्यादी या त्यास तुम्ही मला दारू पिऊन त्रास देता, मारहाण करता व माझ्यावर वारंवार संशय घेता.असे म्हणल्याचा आरोपी यास राग आल्याने त्याने शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण करत लाकडी काठीने मारहाण करुन दुखापत केली. तु जर सोबत आली नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली असल्याचे नमूद फिर्यादी मध्ये म्हटले आहे. दि. ३० रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादी वरुन गुन्हा र. नं. २९१/२०२६ बिएन एस चे कलम ११८(१), ११५(२), ३५२,३५१(२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मच्छिंद्र आडकीत्ते हे करत आहेत.

मारहाण
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मारहाण
मारहाण
मारहाण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मारहाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!