आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मोटार
मोटार

कुकाणा – नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव परिसरात तेलकुडगाव रोड वरील दिनांक 3 रोजी कॅनॉल जवळील अज्ञात चोरट्यांनी शेतातील विहिरींमध्ये बसविण्यात आलेल्या अकबर मुंन्शीभाई पठाण यांच्या मालकीची 3 पानबुडी मोटारी चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोटार

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी विहिरींमध्ये बसविलेल्या 3 पानबुडी मोटारी चोरून नेल्या. सकाळी शेतकरी शेतात गेल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर संबंधितांनी नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मोटार

या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) चा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस वाल्मीक वाघ घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास करत आहेत. परिसरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढत असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील विद्युत उपकरणांची काळजी घ्यावी, तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोटार
मोटार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मोटार
मोटार
मोटार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मोटार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!