
घोडेगाव – नेवासा तालुक्यातील करजगाव येथील तिन शेतकऱ्यांची कांदा बियाणात फसवणूक झाली असून संबंधित कंपनी विरुद्ध ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की येथील बाळासाहेब गोरख देवखिळे, भास्कर पांडुरंग काळे, रावसाहेब सकाहारी ढोबळे या शेतकऱ्यांनी कृष्णाई अॅग्रो मधुन सिध्दांत सिड्स या कंपनीचे कांदा बियाणे दि.१४ सप्टेंबर २०२५ रोजी ४६,०००(शेहेचाळीस हजार) रुपये किंमतीचे बियाणे खरेदी केले होते. साधारण ५५ ते ६० दिवसांनी रोप लागवडीसाठी योग्य झाल्यावर त्याची बाळासाहेब देवखिळे यांनी १०० आर वरती, भास्कर काळे यांनी ८० आर तर १.२०हेक्टर वरती कांदा लागवड केली होती.

लागवडीच्या ३५ दिवसानंतर कांदा पिकात डेंगळे कांदे, मुदती अगोदर परिपक्वता, अपूर्ण वाढ, विरळता तसेच लाल कांदा बियाणे दिसून आले. शेतकऱ्यांनी संबंधित दुकानाशी संपर्क साधला असता त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पहाण्यासाठी बोलवून घेतले होते.

१६ मार्च २०२६ रोजी कंपनी चे झोनल मॅनेजर श्री फुंदे यांनी दुबार पहाणी केली असता त्यामध्ये बियाणे सदोष असल्याचे दिसून आले. त्या नंतर कंपनीशी वेळोवेळी संपर्क साधला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
त्यानंतर सिद्धांत कंपनी कडून आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आले असल्याचे तालुका कृषी अधिकारी नेवासा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी आयुक्तालय पुणे, जिल्हा अधिकारी अहील्यानगर, जिल्हा पोलीस अधीक्षक अहील्यानगर, जिल्हा कृषी अधिकारी, सिध्दांत प्रायव्हेट कंपनी वळदगाव यांना दिलेल्या तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे. शेतकऱ्यांचा कांदा लागवड ते काढणी पर्यंत ६ लाख ७९ हजार ५० एवढा मोठा खर्च झाला.

दि. २६ मार्च रोजी उपविभागीय कृषी अधिकारी श्रीरामपूर, कृषी अधिकारी गुण नियंत्रण नेवासा, यांच्या समवेत तक्रार निवारण समितीने प्रत्यक्ष पहाणी केली असता डेंगळे तसेच ५५ टक्के निकृष्ट कांद्याचे प्रमाण आढळून आले. बियाणे सदोष असुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पहाणी मध्ये आढळून आले.
तक्रार दाराने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अहील्यानगर यांच्या समोर आपणा विरुध्द तक्रार दाखल केली आहे. संबंधित कंपनीला आपले म्हणणे मांडण्यासाठी दि. २७ आॅगस्ट २०२६ रोजी आयोगापुढे हजर राहणे कामी नोटीस बजावण्यात आली आहे.

सिध्दांत सिड्स कंपनीचे झोनल अधिकारी श्री फुंदे यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही. परंतु मार्केटिंग चे रवी भालेराव यांच्या सोबत संपर्क झाल्यावर तुम्ही आमच्या भेंडा येथील कार्यालयात जाऊन माहिती घ्या. असे उलट उत्तर दिले. मला या बाबत काही ही एक माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







