
घोडेगाव – मुम्मका सुदर्शन, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि. संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यामध्ये अवैध चंदनाची वाहतुक व विक्री करणारे इसमा विरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि. संतोष मुटकुळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, रोहीत येमुल, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, चालक चंद्रकांत कुसळकर, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे अशांचे पथक तयार करुन अवैध चंदनाची वाहतुक व विक्री करणारे इसमाविरुध्द कारवाई करणेकामी रवाना केले.

दि. १६ रोजी पथक सोनई पोलीस ठाणे हद्दीत अवैध चंदनाची वाहतुक व विक्री करणारे इसमाबाबत माहिती काढत असताना पथकास आकाश हॉटेलच्या पाठीमागे बाळासाहेब हरीभाऊ गायकवाड रा.चांदा हा विक्रीस व तोडण्यास प्रतिबंध असलेले चंदनाचे झाड कोठुन तरी तोडुन चोरुन घेवुन विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगुन असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन छापा टाकुन एक इसम ताब्यात घेवुन त्याचे नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव बाळासाहे हरीभाऊ गायकवाड, वय- ५२ वर्षे रा.चांदा, असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांकडे चंदनाची लाकडे कोठुन व कोणाकडुन खरेदी केली आहे.

याबाबत विचारपुस करता त्याने सदर चंदनाची लाकडे हे मी माझे स्विप्ट कारमधुन चालक न शरद दत्तात्रय म्हेत्रे रा.चांदा , हा व मी असे रामा शंकर वाघमोडे रा.शेवगाव (फरार), सुरेश शिंदे रा.येवला जि.नाशिक (फरार), राजेंद्र पवार रा.धामोरी ता.कोपरगाव (फरार), यांचेकडुन खरेदी करुन रियाज भाई रा. बु-हाणापूर राज्य मध्यप्रदेश(फरार) यांना विक्री करणार असल्याचे सांगितले.
तसेच इतर आरोपीचे शोध घेतले असता आरोपी शरद दत्तात्रय म्हेत्रे रा. चांदा हा मिळुन आलेला आहे.

ताब्यातील आरोपीची व घराची झडती घेतली, त्याचे ताब्यातुन १,४५,६४५/-रु कि.चे ४८.४९५ किलो. चंदनाची लाकडे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरील आरोपीविरूध्द पोलीस कॉस्टेबल बाळासाहेब अशोक गुंजाळ नेम. स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सोनई पोलीस स्टेशन गुरनं ३२२/२०२६ बिएन एस एस चे कलम ३०३(२), ३(५), भारतीय वन कायदा १९२७ चे कलम ४२ सह महाराष्ट्र वन अधीनियम कलम ३३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, गुन्हयाचा पुढील तपास सोनई, पोलीस स करीत आहेत.

सदरची कारवाई. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







