
घोडेगाव – नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील एका भोळसर अल्पवयीन मुलास खाऊचे अमिष दाखवून लैगिक शोषण केल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की एका ५० वर्षीय आरोपीने येथील एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलास व त्याच्या आणखी दोन मित्रांना पैसे तसेच खाऊचे अमिष दाखवून आरोपीने त्यांच्या शेतातील कोपी मध्ये बोलावून घेत लैगिक शोषण केले.

त्याचे दुसऱ्या मुला मार्फत मोबाईल मध्ये व्हिडिओ चित्रीकरण देखील या नराधमाने यावेळी केले. तसेच सदर घटना बाहेर कुणाला सांगितली तर तुम्हाला मारुन टाकील अशी धमकी दिली असल्याचे नमूद फिर्यादी मध्ये म्हटले आहे. पिडीत मुलाच्या पालकाने दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपी नुरखा बाबुलाल शेख (वय.५०) याचे विरुद्ध बिएन एस चे कलम ३५१(३) सह पोस्को सन २०१२ चे कलम ४,८,१३,१४,१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती कळताच शेवगाव चे पोलीस उपविभागीय अधिकारी निरज राजगुरू तसेच शनी शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक धनवटे, पोलीस उपनिरीक्षक गिरीशकुमार केदार, यांनी घटना स्थळी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीशकुमार केदार हे करत आहेत. या घटनेची माहिती कळताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







