
घोडेगाव – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे तामिळनाडूच्या व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की अकबर हबिबबुला शेख (वय.५३) रा. तामिळनाडू यांना रोखाडी ता. जुन्नर येथील आरोपी वैभव ज्ञानेश्वर मुराडे याने स्वस्तात कांदा देतो असे सांगून दि. २९ मे ते ३० मे २०२४ रोजी घोडेगाव येथे फिर्यादी कडून दोन लाख चौदा हजार रुपये घेतले.

नंतर कांदा व पैसे परत न करता फसवणूक केली असल्याचे दि ८ रोजी सोनई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे. त्या नुसार गुन्हा र. नं. ६/२०२६ भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गावडे हे करत आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

