घोडेगाव — नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाण्याचे हद्दीत अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की भाऊसाहेब अहीलाजी फडके (वय.७२) रा. लांडेवाडी हा दि. २८ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास सोनई बस स्थानकामध्ये एका झाडाच्या आडोशाला गांजा नावाचे अंमली पदार्थांचे सेवन करत असताना आढळून आला होता.

पोलीस काॅस्टेबल गणेश गावडे यांच्या फिर्यादी वरुन २८५/२०२६ एन डी पी एस चे कलम ८(क) सह २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजु भास्कर बऱ्हाटे (वय.५५) रा. बऱ्हाणपूर हा घोडेगाव येथे एका वडापाव च्या दुकानाच्या आडोशाला गांजा ओढताना मिळुन आला. झापवाडी येथे आबासाहेब कारभारी सोनवणे (वय.४०) रा. झापवाडी हा घोडेगाव येथील मार्केट यार्डासमोर गांजा नावाचे अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळला . पोलीस काॅस्टेबल भगवान वाघमोडे यांच्या फिर्यादी वरुन एन डी पी एस कायदा १९८२ कलम ८(क) सह २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन चौधरी हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







