
घोडेगाव– नेवासा तालुक्यातील घोडेगाव व मुकिंदपुर येथीलअवैध दारू धंद्यावर सोनई पोलीसांनी छापेमारी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांना अवैध दारू विक्री विषयी मिळालेल्या गुप्त माहिती नुसार घोडेगाव येथील हाॅटेल घोडेश्वरी मध्ये दिपक गजीनाथ येळवंडे (वय.२५) हा विना परवाना देशी विदेशी कंपन्यांची विना परवाना दारू विक्री करत असताना मिळुन आला. रुपये २४००(दोन हजार चारशे) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस काॅस्टेबल योगेश बोरुडे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा र. नं. २२९/२०२६ महा. दारू बंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गावडे हे करत आहेत. मुकिंदपुर चारी नंबर ४ येथील हाॅटेल महेश च्या आडोशाला ज्ञानेश्वर सुखदेव इथापे (वय.३९) हा विना परवाना दारू विक्री करत असताना आढळून आला. १५०० रुपये किंमतीची विविध कंपन्यांची दारू या ठिकाणाहून जप्त करण्यात आली. पोलीस काॅस्टेबल योगेश बोरुडे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा र. नं. २३०/२०२६ महा. दारू बंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र पवार हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.




कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







