घोडेगाव — नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर पोलीस ठाण्याचे हद्दीत असणाऱ्या रस्तापुर येथे किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाल्याची घटना घडली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी आहे. सिध्देश शांताराम यादव(वय.३०) सिव्हिल हाडको अहील्यानगर हे व आरोपी एकमेकांची नातलग आहेत. दि. २७ रोजी रात्री ११.३० वाजता रस्तापुर गावचे शिवारात सदर इसमांनी गैरकायदाची मंडळी जमवून मागील वादाच्या कारणावरून गैर समज करून तुम्ही आमची टिंगल करता असे म्हणुन लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत दमदाटी केली असल्याचे दि. २८ रोजी दाखल फिर्यादी मध्ये म्हटले आहे.

त्यानुसार यातील आरोपी छगन बापुराव डोंगरे, दिपक छगन डोंगरे, सिमोन भाऊसाहेब लासे,शरद छगन डोंगरे, अरुण छगन डोंगरे, सुवर्णा दिपक डोंगरे, मंदा छगन डोंगरे, कावेरी अरुण डोंगरे, संदिप छगन डोंगरे, रेणुका संदिप डोंगरे, सर्व राहणार रस्तापुर यांच्या विरुद्ध गुन्हा र. नं. ८१/२०२६ बिएन एस चे कलम ११८(१), ११५(२), ३५२,३५१(२) (३), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश लबडे हे करत आहेत. दुसरी फिर्याद ही दिपक छगन डोंगरे यांनी दिली आहे

त्यामध्ये त्यांनी मागील वादाचे कारणावरून गैरसमज करून तुम्ही आमच्या नादाला लागु नका तुमचे तुकडे करु असे म्हणत लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवी गाळ दमदाटी करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. असल्याचे म्हटले आहे. त्या नुसार आरोपी सिध्देश संताराम यादव, जगन्नाथ बापुराव डोंगरे, प्रमीला जगन्नाथ डोंगरे, विनोद जगन्नाथ डोंगरे, बाळु जगन्नाथ डोंगरे, अर्चना बाळु डोंगरे, सोनाली विनोद डोंगरे, सर्व राहणार रस्तापुर यांच्या विरुद्ध गुन्हा. र. नं ८२/२०२६ बिएन एस चे कलम ११८(१), ११५(२), ३५२,३५१(२) (३), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर माळवे हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







