आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
आरक्षण

घोडेगाव– आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेडले परमानंद ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षणाचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या या प्रारूपानुसार ग्रामपंचायतीत एकूण ९ सदस्यसंख्या असून तीन प्रभागांमधून प्रत्येकी तीन सदस्य निवडून दिले जाणार आहेत. आरक्षण जाहीर होताच गावातील राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे.

आरक्षण


जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यानुसार प्रभाग क्रमांक १ मध्ये एक जागा अनुसूचित जाती, एक जागा सर्वसाधारण आणि एक जागा अनुसूचित जमाती महिला राखीव ठेवण्यात आली आहे. या प्रभागाच्या सीमा पूर्वेस गाव अंतर्गत रस्ता, दक्षिणेस सोनई व बेल्हेकरवाडी शिवार, पश्चिमेस शिंदे आळी रस्ता आणि उत्तरेस माळी गल्ली रस्ता अशा निश्चित करण्यात आल्या आहेत.
प्रभाग क्रमांक २ मध्ये एक जागा सर्वसाधारण, एक जागा अनुसूचित जाती महिला राखीव आणि एक जागा सर्वसाधारण महिला राखीव ठेवण्यात आली आहे. या प्रभागाच्या हद्दीत पूर्वेस शिंदे गल्ली व मुळा नदी रस्ता, दक्षिणेस मुळा नदीपात्राकडे जाणारा रस्ता, पश्चिमेस मुळा नदी आणि उत्तरेस मुळा नदीचा परिसर समाविष्ट आहे.

आरक्षण


प्रभाग क्रमांक ३ मध्ये एक जागा सर्वसाधारण, एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) महिला राखीव आणि एक जागा सर्वसाधारण महिला राखीव ठेवण्यात आली आहे. या प्रभागाच्या सीमा पूर्वेस शिरसगाव शिवार, दक्षिणेस सोनई रस्ता, पश्चिमेस सोनई रस्ता व गाव अंतर्गत रस्ता आणि उत्तरेस मुळा नदी व शिरसगाव रस्ता अशा आहेत.

आरक्षण


या प्रारूप आरक्षणावर नागरिक, राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांकडून सूचना व हरकती मागविण्यात येणार असून अंतिम आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूक समीकरणे अधिक स्पष्ट होणार आहेत. आरक्षणाच्या घोषणेमुळे विविध सामाजिक घटकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या स्वाक्षरीने हा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून दि. १९ जून २०२६ रोजी अहिल्यानगर येथे हा आदेश जारी करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षणाचा मोठा प्रभाव पडणार असल्याने गावकऱ्यांचे लक्ष आता अंतिम आरक्षण जाहीर होण्याकडे लागले आहे.

आरक्षण
आरक्षण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आरक्षण
आरक्षण
आरक्षण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आरक्षण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!