आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पोलीस

घोडेगाव — नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपत सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील महात्मा फुले बालसंगोपन केंद्र अनाथ, निराधार आणि वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून समाजापुढे प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. २९ जून रोजी श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा फुले बालसंगोपन केंद्राला सोनई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भेट दिली.

पोलीस

या केंद्रामध्ये भटक्या-विमुक्त प्रवर्गातील अनाथ, निराधार, ऊसतोड कामगार, वीटभट्टी मजूर तसेच गरीब आणि शिक्षणापासून वंचित मुला-मुलींच्या शिक्षणासाठी कार्य केले जाते. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून उपस्थित अधिकारीही भारावून गेले. कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. आर. आडकिते, पोलीस कॉन्स्टेबल भगवान वाघमोडे तसेच सोनई पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस

संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ चौगुले यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले. समाजातील वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोलीस विभागाने घेतलेला हा पुढाकार उपस्थितांनी कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली.

पोलीस
पोलीस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!