घोडेगाव – मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सोनई येथील श्री शनिश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा. किशोर बापू निमसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शनिश्वर कनिष्ठ महाविद्यालया उपप्राचार्य गोरख दहातोंडे सेवा निवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर पर्यवेक्षक प्रा. किशोर निमसे यांची मुळा एज्युकेशन सोसायटीने उपप्राचार्य पदी नियुक्ती केली. उपप्राचार्य किशोर निमसे यांना २५ वर्षांचा अध्यपनाचा अनुभव असून ते रसायनशास्त्र विषयाचे गाढे अभ्यासक असून गेल्या पाच वर्षांपासून ते कनिष्ठ महाविद्यालयात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. निमसे यांचे संस्थेचे मार्गदर्शक माजी मंत्री शंकरराव गडाख, उपाध्यक्ष उदयन गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सह सचिव डॉ. विनायक देशमुख यांनी अभिनंदन केले.

नियुक्ती बद्दल उपप्राचार्य निमसे यांचा शनिश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अनिल पिसाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा विभाग प्रमुख प्रा. सुनील गर्जे, प्रा. कैलास पिटेकर, प्रा. संतोष सुकाळकर, प्रा. गणेश मोरे, प्रा. गणेश कोलते, प्रा. दिपक पाटील, प्रा. प्रताप येळवंडे, प्रा. कैलास घावटे, प्रा. गोपाल आव्हाड, प्रा. अशोक घोरपडे, प्रा. पी रोहिदास तांबे, प्रा. सुभाष येळवंडे, प्रा. योगेश दरंदले, प्रा. सोमनाथ खाडे, प्रा. जगदीश भदगले, प्रा. निलेश म्हसे, प्रा. सुनील भारस्कर, प्रकाश गडाख, गोविंद भागवत, हरिदास कर्डिले उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







