
घोडेगाव – नेवासा तालुक्यातील वांजोळी येथे शेतात जातांना महिलेस अडवून मारहाण करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की पांढरी पुल वांजोळी येथील एक महिला आपल्या शेतात जात असताना आरोपी दत्तात्रय सतिश जवरे, स्मिता दत्तात्रय जवरे, कल्याणी निखिल जवरे, निखिल दत्तात्रय जवरे यांनी फिर्यादी महिलेस अडवून तुला सांगितलेले कळत नाही का, या रस्त्याने जायचे नाही असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असल्याचे नमूद फिर्यादी मध्ये म्हटले आहे.

दाखल फिर्यादी नुसार बिएन कलम चे कलम ७४,१२६(२), ११५(२), ३५२, ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गावडे हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







