
घोडेगाव – नेवासा तालुक्यातील माका येथे एका महिलेशी असभ्य वर्तन केल्या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की. फिर्यादी महीला या दि. १६ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गावातील आपल्या दुकानात शिंगटे यांच्या शेताजवळुन जात असताना आकाश बाबासाहेब कोकाटे हा दुचाकीवरून आला व आपली गाडी रस्त्यावर आडवी लावली.

फिर्यादी यांच्या जवळ येऊन हात धरत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. फिर्यादी यांनी कोकाटे यांच्या वडीलांना फोनवरून घडलेल्या प्रकार कथन करत त्यांना समजावून सांगण्याचे सांगितले.

नंतर संगिता बाबासाहेब कोकाटे या फिर्यादी यांच्या घरी आली तसेच शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करु लागली.

या झटापटीत माझ्या गळ्यातील मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून तोडून नेले. परत जर आमच्या नादाला लागला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असल्याचे नमूद फिर्यादी मध्ये म्हटले आहे. दि. १६ रोजी आरोपी आकाश बाबासाहेब कोकाटे, संगिता बाबासाहेब कोकाटे, बाबासाहेब सिताराम कोकाटे सर्व राहणार माका यांच्या विरुद्ध गुन्हा र नं. बिएन एस चे कलम ७४,११९(१), ११५(२), ३५२,३५१(२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पा तमनर हे करत आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







