घोडेगाव – नेवासा तालुक्यातील पांढरीपुल व घोडेगाव येथील अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली.

या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १९रोजी पांढरीपुल ते वांबोरी रोड लगत असणाऱ्या एका पत्र्याच्या टपरी मध्ये कल्याण मटका नावाचा हारजीतीचा खेळ सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी जाऊन पहाणी केली असता समीर युसफ शेख हा कल्याण नावाचा मटका हारजीतीचा खेळ खेळताना व खेळविताना मिळुन आला.

११५० रुपये रोख व खेळण्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ झांबरे यांच्या फिर्यादी वरून महा. जुगार प्रतिबध कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे पांढरीपुल वांजोळी शिवारात मिरी कडे जाणाऱ्या रोड लगत एका पत्र्याच्या टपरी मध्ये इस्माईल फकीरमोहम्मद शेख रा. खोसपुरी हा विना परवाना बेकायदेशीर दारू ची विक्री करत असताना मिळून आला.
११६० रुपये किंमतीच्या २९ दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ झांबरे यांच्या फिर्यादी वरून महा. दारू बंदी कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोडेगाव येथील चौफुलीवर बाळु दशरथ गायकवाड रा. घोडेगाव हा सोनई कडे जाणाऱ्या टपरी मध्ये बेकायदेशीर दारू ची विक्री करत होता. १३६० रुपये किंमतीच्या १७ बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ झांबरे यांच्या फिर्यादी वरून महा. दारू बंदी कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.

सदरील कारवाई ही अहील्यानगर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सुचनेनुसार व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ झांबरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब नागरगोजे, पोलीस काॅस्टेबल किशोर शिरसाठ यांच्या पथकाने केली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







