नेवासा – गोसेवा आयोगाने राज्य नोंदणी केलेल्या गोशाळेतील जनावरांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विविध अटी व निकष लागू करण्यात आले असून ते पूर्ण करणाऱ्या गोशाळांमधील देशी अथवा गावरान जनावरांना प्रतिदिन ५० रुपये प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून गोशाळा चालवणाऱ्या संस्थांचे प्रस्ताव तपासून त्यातील त्रुटींची पूर्तता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार असून पात्र असणाऱ्या गोशाळांची माहिती गोसेवा आयोग व राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाला सादर करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने देशी जनावरांचे संवर्धन आणि पालन करणाऱ्या योसंस्थांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नगरसह राज्यातील जिल्ह्यात गोसेवा केंद्रांची नोंदणी सुरू असून नोंदणीसाठी अटी व शर्ती लागू करण्यात आले आहेत. त्या पूर्ण करणान्या गोसंस्थांना अनुदान रूपाने मदत करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात ८२ गोशाळा अथवा गोपालक करणाऱ्या संस्थांनी पशुसंवर्धन विभागाकडे नोंदणी केली असून ही नोंदणी गोसेवा आयोगाने सक्तीची केलेली आहे. संबंधित नोंदणी केलेल्या गोशाळांची प्रत्यक्षात, तसेच कागदपत्रांची पडताळणी पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे. ‘परिपोषण’ योजनेअंतर्गत हे काम सुरू आहे.
नोंदणी आणि पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या गोशाळांना प्रति जनावर सरकारच्या वतीने पन्नास रुपये प्रतिदिन अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी गोसेवा संस्थांना प्रपत्र ‘अ’ व प्रपत्र ‘ब’ बाबतीची माहिती, गोशाळेच्या बँक खात्याचा तपशील, भारत सरकार पशुधन प्रणालीवर संबंधित गोशाळेतील पशुधनाची नोंद, तसेच कानात
जिओ टॅगिंग आवश्यक करण्यात आलेले आहे. अनुदानासाठी पात्र असणाऱ्या गोशाळांनी त्यांच्या संस्थेचे मागील तीन वर्षाचे ऑडिट सक्तीचे करण्यात आले असून संबंधित संस्थेची धर्मदाय आयुक्त कार्याकडे नोंदणी आवश्यक आहे. यासह गोसेवा आयोगाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणाऱ्या गोशाळा अथवा संस्था अनुदानासाठी पात्र राहणार आहेत. यासाठी संबंधित संस्थांनी त्यांचे प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाकडे सादर करण्यात आले असून आलेल्या प्रस्तावांची पडताळणी व तपासणी सुरू आहे. यात काही संस्थांच्या कागदपत्रांच्या त्रुटी असून त्या पूर्ण करण्यासाठी कालावधी देण्यात आलेला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात ही पडताळणी पूर्ण होणार असून त्यानंतर जिल्ह्यात गो अनुदानासाठी किती संस्था पात्र ठरणार याचा तपशील समोर येणार आहे.
जिल्ह्यातील गोशाळेत १५ हजार गायी संबंधीत गोशाळांमध्ये ५० पेक्षा अधिक गोवंशीय जनावरे असणे बंधनकारक असून नगर जिल्ह्यात सध्या ८२ गोशाळामध्ये १२ ते १५ हजार गायींचा समावेश असल्याचा अंदाज आहे. पशुसंवर्धन विभागाच्या पडताळणीनंतर याबाबतचा निश्चित आकडा समोर येणार आहे. याबाबतच्या सुचना राज्य गोसेवा आयोगाच्यावतीने देण्यात आलेल्या अहेित. त्यानूसार कार्यवाही करण्यात येत आहे.
राज्यात सर्वाधिक पशुधन नगरमध्ये राज्यात सर्वाधिक पूशधन हे नगर जिल्ह्यात आहे. नगरनंतर पुणे आणि त्यानंतर कोल्हापूरच जिल्ह्याचा समावेश आहे. विसाव्या पशूगणनेनुसार जिल्ह्यात ४६ लाख १२ हजार पशूधन असून यात १३ हजार गायींचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात नव्याने पशूगणना सुरू असून गो शाळांची माहिती आणि पात्र असणाऱ्या संस्थांची माहिती घेण्यात येत आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.