नेवासा – महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर, व पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी संलग्न श्री.मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्था संचलित जिजामाता पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय, ज्ञानेश्वरनगर,भेंडा येथे दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी पशुधन व्यवस्थापन संबंधित शिबीर व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ,नागपूर येथील मा.कार्यकारी परिषद सदस्य श्री.आर.एस. खांदे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. तसेच पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणीचे सहयोगी प्राध्यापक डॉ.एम.डी.खरवडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.
![पशु](https://annews.co.in/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-11-at-10.58.14-1024x1024.jpeg)
सदर शिबिरामध्ये स्वच्छ दुध उत्पादन विषयावर पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणीचे समन्वयक डॉ.पंडित नांदेडकर साहेब यांनी स्वच्छ दुध उत्पादन कसे करावे, स्वच्छ दुध उत्पादनाचे महत्व व गरज, स्वच्छ दुध उत्पादनासाठी पशुधनांची कशा प्रकारे काळजी व निगा ठेवावी या विषयी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच भविष्यात स्वच्छ दुध निर्मितीतून काय बदल होणार आहेत याविषयी उपस्थितांचे शंका निवारण करून स्वच्छ दुध उत्पादन याविषयी समाजामध्ये जनजागृती करण्यास उपस्थितांना आवाहन केले. सदर कार्यक्रमानिमित्त विद्यालयाचे प्राचार्य श्री.सोपान मते यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले या कार्यक्रमासाठी प्रगतशील शेतकरी श्री.योगेश बानकर, श्री.सुमित कापसे उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक डॉ.शरद शिंदे, श्री.काकासाहेब उकिर्डे, डॉ.कृष्णा चामुटे, श्री.गौरव ठुबे, श्री.आदित्य वाबळे व श्री.अशोक मासाळ यांनी परिश्रम घेतले.
![पशु](https://annews.co.in/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-23-at-10.05.06-766x1024.jpeg)
![newasa news online](https://annews.co.in/wp-content/uploads/2020/07/abhi-1024x512.png)
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
![पशु](https://annews.co.in/wp-content/uploads/2020/09/telegram-invite.png)
![पशु](https://annews.co.in/wp-content/uploads/2020/08/photo6147886037003776927.jpg)
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.