नेवासा – गुलीयन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) नावाच्या आजाराने पुण्यात थैमान घातले असतानाच अहिल्यानगर शहरातील रुग्णालयात जीबीएस संशयित चार रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. हे चौघेही रुग्ण शहराबाहेरील असून एकाला पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तर, तिघांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयात एक अल्पवयीन मुलगी जीबीएस संशयित आढळल्याने तिला तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे. सदर मुलगी ही जिल्ह्याबाहेरील असल्याचे सांगण्यात आले. तर, शहरातील खासगी रुग्णालयांत तीन संशयित रुग्ण आढळल्याची माहिती महापालिकेकडे प्राप्त झाली आहे. त्या तिघांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत अहिल्यानगरमध्ये आढळले.आहे. खासगी रूग्णालयात आढळलेले रूग्ण आष्टी (बीड), वाकोडी (ता. नगर) व राहुरी तालुक्यातील आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
दरम्यान, गुलीयन बॅरी सिंड्रोम हा संसर्गजन्य आजार नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. शहरात खासगी रूग्णालयात आढळलेले रूग्ण शहरांतील नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. संशयित रूग्ण आढळल्यास महापालिकेला कळवण्याच्या सूचना खासगी रूग्णालयांना देण्यात आल्या आहेत, असे महापालिकेचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यात जीबीएस एकही बाधित रुग्ण नाही.जिल्हा रुग्णालयाकडे एका संशयीत रुग्णांची माहिती आली होती. संबंधित रुग्णाला पुढील उपचारासाठी पुण्याला जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, संबंधीत संशयीताने नगरमध्ये उपचार घेवून आता तो पूर्ण बरा झाला असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. नगरमध्ये जीबीएसची स्थिती सामान्य असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.