देवगड – नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री दत्त जयंती महोत्सवास श्री दत्त मंदिर देवस्थान व गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत राष्ट्रीय संत हभप भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांचे पूजन करून व गुरुचरित्र ग्रंथ वाचनाने रविवारी भक्तीमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला.त्यानंतर उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांच्या हस्ते ज्ञानसागर येथे ग्रंथपूजन करून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा शुभारंभ करण्यात आला.शनिवार दि.१४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्री दत्तजन्माचा मुख्य जन्म सोहळा होणार आहे.
श्री दत्तजयंती सोहळयाच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र देवगड येथे अखंड हरिनाम सप्ताह त्यानिमित्ताने कीर्तन महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन श्री समर्थ सदगुरू किसनगिरीजी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने व गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख गुरुवर्य महंत राष्ट्रीय संत श्रद्धेय श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.
श्री दत्त जयंती महोत्सवाचा शुभारंभ रविवारी ग्रंथ पारायणाने करण्यात आला.या सोहळयात पहाटे ४ ते ४.३० मंगल सनई चौघडा वादन,४.३० ते ६.३० काकडा भजन,श्रींची प्रात:आरती, सकाळी ६.३० ते ७.३० दर्शन प्रदक्षिणा,७.३० ते ८.३० गीतापाठ,विष्णू सहस्त्रनाम, सकाळी ९ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण,११.३० ते १ भोजन, दुपारी १ ते ३ समयानुसार आलेल्या गुणवंतांचे कार्यक्रम, दुपारी ३ ते ५ सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ, श्रींची सायंम आरती व दर्शन,रात्री ७ ते ८ भोजन,तर रात्री ८.३० ते १०.३० यावेळेत कीर्तन महोत्सव होणार आहे.
रात्री ८.३० ते १०.३० यावेळेत होणाऱ्या किर्तन महोत्सवात रविवारी दि.८ डिसेंबर रोजी गोकुळजळगाव येथील हभप गंगाराम महाराज राऊत,सोमवार दि.९ डिसेंबर रोजी पिंपरखेडा येथील हभप विठ्ठल महाराज शास्त्री चनघटे,मंगळवार दि.१० डिसेंबर रोजी आळंदी येथील हभप चंदिले नाना महाराज,बुधवार दि.११ डिसेंबर रोजी नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे महंत वेदांताचार्य हभप देविदास महाराज म्हस्के,गुरुवार दि.१२ डिसेंबर रोजी आळंदी येथील हभप उमेश महाराज दशरथे,शुक्रवार दि.१३ डिसेंबर रोजी भागवताचार्य हभप केशव महाराज उखळीकर, शनिवार दि.१४ डिसेंबर रोजी देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी दि.१४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्रींना तोफांची सलामी देऊन गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्यासह संत महंतांच्या प्रमुख उपस्थितीत श्री दत्त जन्म सोहळा साजरा होणार आहे. तर रविवारी दि.१५ डिसेंबर रोजी देवगड संस्थानचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या सकाळी ८ ते १० यावेळेत होणाऱ्या काल्याच्या किर्तनाने आठ दिवस चालणाऱ्या श्री दत्त जयंती महोत्सव सोहळयाची सांगता होणार आहे.
श्री दत्त जन्म सोहळयाच्या निमित्ताने होणाऱ्या दत्त नाम यज्ञ सप्ताह व त्यानिमित्ताने आयोजित ज्ञानेश्वरी पारायणासह रात्री होणाऱ्या नामवंत किर्तनकारांच्या कीर्तन महोत्सवातील कीर्तन श्रवणाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थान श्री क्षेत्र देवगड भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.