नेवासाफाटा – त्रिमूर्ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने स्कूल कनेक्ट २ अभियान यशस्वी पद्धतीने राबविण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे होणाऱ्या विद्यार्थी उपयोगी शैक्षणिकदृष्ट्या बदलाबाबत विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने स्कूल कनेक्ट संपर्क अभियान आयोजित करण्यात आले होते. विद्यापीठ अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातर्फे महाविद्यालयाच्यावतीने एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये त्रिमूर्ती आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. आरसुळे यांचे मार्गदर्शन लाभले. विविध स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज व्हिजीट टूर घेण्यात आले. यावेळी प्रा. निकिता बर्गे, प्रा. श्रीमती पठाण, प्रा. श्रीमती नवथर, प्रा. जावळे, प्रा. खेडकर आदी उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.