नेवासा – विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिनची पडताळणी करण्यासाठी अर्ज दाखल केलेल्या नेवासा आणि श्रीगोंदे विधानसभा मतदार संघाची तपासणी २१ ते २४ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी झाली.निवडणुकीतील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना ईव्हीएम मशिन पडताळणीचा विशेष अधिकार निवडणूक आयोगाने दिला आहे. एका मशिनच्या पडताळणीसाठी ४७हजार २०० रूपये शुल्क आहे. हे शुल्क भरण्यासाठी मुदत दिलेली आहे. कोणत्या उमेदवाराने निकालाला न्यायालयात आव्हान दिलेले नसेल तर निकालाच्या ४५ दिवसांनी ईव्हीएमची पडताळणी केली जाते.
ईव्हीएम पडताळणीसाठी जिल्ह्यातील दहा उमेदवारांनी शुल्क भरले होते. यापैकी पाच उमेदवारांनी या प्रक्रियेतून माघार घेतली आहे. त्यामध्ये संदीप वर्षे (कोपरगाव), प्राजक्त तनपुरे (राहुरी), बाळासाहेब थोरात (संगमनेर), प्रभावती घोगरे (राहाता), अभिषेक कळमकर (अहमदनगर शहर) या उमेदवारांचा समावेश आहे. ड. प्रताप ढाकणे (पाथर्डी-शेवगाव), राणी लंके (पारनेर) या उमेदवारांनी निवडणुकीला न्यायालयात आव्हान दिले आहे. शंकरराव गडाख (नेवासे) आणि राहुल जगताप (श्रीगोंदे) या दोन उमेदवारांचे अर्ज शिल्लक आहेत. या दोन्ही मतदार संघातील ईव्हीएम मशिनची पडताळणी ही ता. २१ ते ता. २४ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे चार अभियंते आणि एक पर्यवेक्षक या पडताळणीसाठी येणार आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.