ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
वाकचौरे

13.57 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा

शिर्डी – शिर्डी लोकसभा मतदार संघातील विविध तीर्थक्षेत्र व पर्यटनासाठी केंद्राकडे नुकताच 550 कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर केला असून लवकरच आपल्या मतदार संघाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करत खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शुभहस्ते नुकतेच नेवासा तालुक्यातील पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत एकूण 13.57 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावरून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर तर प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ शेळके, ग्राहक सेनेचे प्रांतिक सदस्य मुकुंद सिनगर, नेवासा तालुकाप्रमुख मच्छिन्द्र म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

वाकचौरे

सर्वप्रथम तालुक्यातील सोनई बेल्हेकरवाडी,ते एम. डी. आर खेडलेपरमानंद ५/६०० कि.मी (५.५४ कोटी) गेवराई ते भेंडा बु.ते नजिक चिंचोली ते दिघी रस्ता ६/८०० कि.मी (५.०५ कोटी) नारायणवाडी, निपाणी निमगांव, खरवंडी, हिंगोणी ते विठ्ठलवाडी रोड ३/५३० कि.मी (२.९८ कोटी) अशा विविध विकास कामातील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर खा.वाकचौरे यांचा मौजे हिंगोणी येथे तालुक्यातील पंचक्रोशीच्या वतीने भव्य नागरी सत्कार आणि सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आताषबाजीने व शिवसेनेच्या घोषणेने जल्लोषात स्वागत करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी अधिक सांगितले की, खासदार निधी काय असतो, हेच सामान्य जनतेला माहित नव्हते. माझ्या हातून ही सेवा करून घेतली हे माझं भाग्य. शिर्डी मतदारसंघातील जवळजवळ 6.5 तालुक्यात प्रत्येक गावात कामं केले.

वाकचौरे

मी स्वतः प्रशासनातील सेवानिवृत्त अधिकारी आणि नेवासा तालुका माझी कर्मभूमी असल्याने मतदार संघातील अडीअडचणी वयक्तिक प्रश्न, शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब,युवकांच्या प्रश्नावर नेहमीच अग्रभागी ठेवून सोडविण्याचे काम केले. असेच कामं यापुढेही पूर्ण क्षमतेने करत राहणार असून तुमची सर्वांची खंबीर साथ हवी असल्याचे शेवटी आवर्जून सांगितले.
शेवटी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी जगदंबा देवीचे आशीर्वाद घेऊन येथील आजूबाजूच्या जवळपास 25 गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सोसायटीचे पदाधिकारी व प्रमुख ग्रामस्थांशी संवाद साधत तेथील प्रश्न समजून घेतले. अनेक विकासाच्या कामांना जाग्यावर तात्काळ मंजुरी देऊन जनतेचा खरा सेवक असल्याचे दाखवून दिले. बेल्हेकरवाडी येथील घरकुल, शिवरस्ता, अंतर्गत रस्ते त्याचबरोबर विजेच्या प्रश्नाबाबत तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून मार्गी लावला. येथील ग्रामस्थांनी खासदार वाकचौरे यांच्या कामाची पद्धत बघून अत्यंत समाधान व्यक्त करत आभार मानले.

वाकचौरे


यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ शेळके, नेवासे तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के, ग्राहक सेनेचे मुकुंद सिनगर यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाबासाहेब गोल्हार, युवासेनेचे पंकज लांभाते, ग्राहक मंचाचे उपजिल्हा संघटक काळू हाटकर, शेतकरी सेनेचे पंडित सोनवणे, डॉ एकनाथ जाधव, बाबासाहेब फोफसे, बेल्हेकरवाडी सरपंच गणेश पवार, उपसरपंच सुदाम बर्डे, तंटामुक्ती अध्यक्ष भरत बेल्हेकर, दत्तात्रय बेल्हेकर, जयराम कदम, किशोर सोनवणे, कानिफनाथ येळवंडे,गणेश गडाख, आसाराम बेल्हेकर, सुरेश शिंदे,कुंडलिक बेल्हेकर, सुभाष कुरकुटे,संजय गडाख, संतोष शिंदे यांच्यासह कॉन्ट्रॅक्टर बी.एस.सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता संजय गायकवाड साहेब, सह अभियंता गुंजाळ साहेब, ग्रामविकास अधिकारी कृष्णा बडे, शशिकांत बेल्हेकर, कैलास शिंदे, सिताराम रोठे,भाऊसाहेब राजळे, सकाहारी राजळे आदींसह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन बाळासाहेब सोनवणे यांनी तर आभार बाळासाहेब पाटील यांनी मानले.

वाकचौरे
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वाकचौरे
वाकचौरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वाकचौरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!