नेवासा – चालू वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षेत होणारे गैरप्रकार, कॉपी प्रकरणाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यात जिल्ह्यात ज्या परीक्षा केंद्रावर कॉपी आणि अन्य गैरप्रकार आढळून येतील, अशा परीक्षा केंद्रांची मान्यता पुढील वर्षीपासून कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. तसेच यात सहभागी असणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी घेतला आहे.
आगामी दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या दक्षता
समितीची शुक्रवारी नगरला बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस विशेष शाखेचे निरीक्षक संतोष खेडकर, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, निरंतरचे बाळासाहेब घुगे, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, विस्तार अधिकारी सुरेश ढवळे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात ११ फेब्रुवारी ते १८ मार्च बारावीचे तर २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा होत आहे. या परीक्षेच्या नियोजनासाठी दक्षता समितीची बैठक पार पडली. परीक्षेदरम्यान दोन्हीही इयत्तांच्या गणित व इंग्रजीच्या पेपरला गटशिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा केंद्रावर पूर्ण वेळ बैठे पथक तैनात केले जाणार आहे. तसेच सर्व तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. केंद्रस्तरावरही स्वतंत्र दक्षता पथक कार्यरत राहणार आहे.
जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी १०९ केंद्र असून ६३ हजार ६५८ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. तर दहावीसाठीचे १८४ केंद्र राहणार असून याठिकाणी ६८ हजार ९९१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यात परीक्षेच्या कालावधीत २१ परीरक्षक यांची नेमणूक करण्यात आली असून ७ ठिकाणी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
परीक्षेसाठी जिल्हास्तरावर असणाऱ्या जिल्हाधिकारी यांच्या पथकात वर्ग १ व वर्ग २ चे अधिकारी यांच्यासह एक महिला .व.अन्य ३ सदस्य सहणार आहेत. प्राचार्य डाय यांच्या पथकात स्वतः डायटचे प्राचार्य, त्यांच्या संस्थेतील वर्ग २ चे अधिकारी, इतर दोन सदस्य व एक महिला कर्मचारी यासह शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक, शिक्षणाधिकारी योजना, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक व शिक्षण विभागातील महिला अधिकारी यांची स्वतंत्र पथकेवर परीक्षेवर नियंत्रण ठेवणार आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.