नेवासा – वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील पंचगंगा शुगर अॅण्ड पॉवर प्रायव्हेट लिमिटेडने सव्वा लाख टन ऊस गाळपाचा टप्पा ३० जानेवारीला पार केला. पंचगंगा कारखाना प्रशासनाने योग्य नियोजन करत प्रतिदिनी ६५०० टन गाळप क्षमता असलेल्या या कारखान्याने जवळपास गाळप क्षमते इतक्या सरासरीने गाळप करून हा यशस्वी टप्पा पूर्ण केला.
पंचगंगा शुगर अॅण्ड पॉवर कारखान्याची उभारणी वैजापूर, गंगापूर व रत्नपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणी व लोकप्रतिनिधींच्या आग्रहामुळे केली गेली आहे. या कारखान्याची क्षमता ६५०० टन प्रतिदिन असून, इतर उपपदार्थांची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. कारखान्याने गाळप केलेल्या उसास प्रति टन २८५० रुपये असा अॅडव्हान्स जाहीर केला आहे, जो दर अंतिम नाही.
कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तोडणी व नियोजन करण्यासाठी हार्वेस्टर, ट्रक, ट्रॅक्टर टोळी व जुगाड यांची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या वजनात होणारी घट थांबवण्यासाठी ऊस तोडणी कामगारांनी कुठल्याही शेतकऱ्याचा ऊस जाळून तोडला नाही, हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शेतकऱ्यांना वजन काट्यावर वजन करून त्यांच्या उसाच्या वजनाची खात्री करण्याची सुविधा देण्यात आली आहे, ज्यावर कारखाना प्रशासनाची हरकत नाही.
कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांना विनंती केली आहे की, ते आपला ऊस पंचगंगा कारखान्यास देऊन सहकार्य करावे. नवीन लागवड केलेल्या उसाची तसेच खोडवा पिकाची नोंद कारखान्यास द्यावी, ज्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी हमीपत्र मिळेल. ऊस तोडणी व वाहतूक बाबतीत काही अडचण असल्यास कारखान्याच्या शेतकी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील कारखाना प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.