नेवासा : ज्येष्ठ नागरिकांना व्याज उत्पन्नावरील करकपातीची मर्यादा १ लाख रुपये आणि भाड्यावरील कराची मर्यादा २.४ लाख रुपयांवरून वाढवून ६ लाख रुपये करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात देऊन मोठा दिलासा दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांकडे अधिक पैसे राहावेत या दृष्टीने या करसुधारणांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर मूळ स्रोतातून करकपातीचे (टीडीएस) तर्कसंगतीकरण करण्याचा प्रस्ताव देखील मांडला.
ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज उत्पन्नावरील करकपातीची मर्यादा सध्याच्या ५०,००० रुपयांवरून १ लाख रुपये करण्यात येत आहे. ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांच्या बाबतीत, व्याजावरील टीडीएस मर्यादा सध्याच्या ४०,००० रुपयांवरून ५०,००० रुपये करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीमअंतर्गत पैसे पाठवण्यावरील ‘मूळ स्रोतातून कर संकलन (टीसीएस) मर्यादा ७ लाख रुपयांवरून १० लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्तावही मांडण्यात येत असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.