नेवासा – शहरातील जवळपास 75 टक्के व्यापार पेठ ही शासकीय जागेवर वसलेली आहे . त्यामुळे बहुतांश व्यापाऱ्यांना पक्की बांधकामे करता येत नाहीत . त्यामुळे राष्ट्रीयकृत बँका कर्ज पुरवठा करत नाहीत , होलसेल व्यापारी मोठ्या प्रमाणात मालाचा पुरवठा करत नाहीत , इन्शुरन्स कंपन्या इन्शुरन्स सेवा देत नाहीत . चोऱ्या , जळीत यामुळे होणारे नुकसान यांना तोंड द्यावे लागते . त्यातच दर दोन वर्षांनी होणाऱ्या अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे दुकानचे व मालाचे नुकसान होऊन आर्थिक घडी विस्कटते . त्यामुळे फारशी बचत न होता फक्त कसाबसा प्रपंच चालतो . या सर्व बाबींमुळे नेवासा शहराची व्यापार पेठ मृत्युपंथाला लागलेली आहे .
यातच भर म्हणून श्रीरामपूर रोड व बस स्थानक परिसरातील व्यापाऱ्यांना पंधरा मीटर पर्यंत दुकाने काढण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने सांगितले आहे त्यामुळे शहरातील सर्व छोटे-मोठे व्यापारी उध्वस्त होणार आहेत . अतिक्रमणे काढून त्या मोकळ्या जागेत प्रशासन नेमके काय करणार आहे ? हे मात्र कुणीही सांगायला तयार नाही .सध्याचा रस्ताच पुरेसा मोठा आहे तोआणखी मोठा करून तिथे डिव्हायडर व स्ट्रीट लाईट होणार आहेत का ? त्यासाठी काही आर्थिक तरतूद केली आहे का ? यावर प्रशासन काही बोलत नाही.
जिल्हा परिषद मालकीच्या जागेत व्यापारी संकुल बांधकामा बाबतचा प्रस्ताव अनेक वर्षापासून प्रलंबित आहे . अतिक्रमण काढण्या अगोदर सदर प्रस्तावाला मंजुरी देऊन आर्थिक तरतूद करून मगच अतिक्रमण काढावे तोपर्यंत बारा मीटरची हद्द कायम करावी अशी सर्व व्यापाऱ्यांची मागणी आहे . प्रशासनाने व राजकीय पदाधिकाऱ्यांनी आणि पालकमंत्र्यांनी याबाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून नेवासा शहराची बाजारपेठ उध्वस्त होण्यापासून वाचवावी अशी अपेक्षा व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.