खेडेगावात दहा हजार झाडावर यशस्वी प्रयोग; 65 एकरात बहरली बोरांची बाग.
सोनई – नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथील माऊली बोरांना राज्यासह व परराज्यात मोठी पसंती मिळत आहे.
माऊली पवार यांनी पुनतगाव मध्ये पारंपरिक पिकांना फाटा देऊन सन 1987 -1988 मध्ये तब्बल 35 वर्षापूर्वी प्रथम बोर फळाची लागवड केली, सततची पाणी टंचाई व क्षारयुक्त पाणी, मुरमाड जमीन, असल्या कारणाने पुनतगाव सारख्या ग्रामीण खेड्यामध्ये कृषिभूषण ज्ञानेश्वर गंगाधर पवार उर्फ माऊली पवार यांनी बोर लागवडीचा नाविन्यपूर्ण प्रयोग साकारला, प्रथम 32 एकर क्षेत्रात बोर रोपची लागवड करण्यात आली. रोपांमध्ये पंधरा फूट अंतर सोडून लागवड करण्यात आली व सरी मध्ये वीस फूट अंतर सोडण्यात आले.
पंधरा बाय वीस मध्ये बोरांच्या रोपांची लागवड करण्यात आली, गावरान बोरांच्या झाडाच्या बिया जतन करून त्या जमीन पुरवण्यात आल्या व रोप वाढीला लागल्या नंतर त्यांना जातिवंत कलम करण्यात आले व सेंद्रिय खतांचे व्यवस्थापन योग्य पाणी नियोजन काळजीपूर्वक दिलेले लक्ष यातुन बोरांचे उत्पादन चांगले निघाल्यानंतर सन 1993 ते सन 2015 पर्यत माऊली पवार यांनी जवळपास तब्बल 60 एकरावर बोरांच्या रोपांची लागवड केली इतक्या मोठ्या प्रमाणात एका शेतकऱ्यांने बोरांची अशी लागवड अन्य कुठेही केलेली आढळत नाही मोठ्या जिद्दीने व काष्ठाने पवार कुटूंबीयांनी पुनतगाव येथे बोर शेती फुलवली आहे.
साधारण नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत बोर फळ निघण्याचा काळ असतो, सरासरी एका झाडाला १८० ते २०० किलो बोर माल निघतो, बोर तोडणी करण्यासाठी आदिवासी भागातील मजूर काम करतात त्यामुळे त्यांना एका जागेवर रोजगार उपलब्ध करून दिला जातो 4 महिन्याच्या काळात ते त्या ठिकाणी वास्तव्य करतात.
उत्कृष्ट तंत्रज्ञान वापरून बोरांवर फवारणी केली जाते यासाठी स्वयंम चलीत यंत्र सामुग्रीने त्या ठिकाणी वापर करतात, सेंद्रिय शेती, शेणखत या खताचा वापर जास्त प्रमाणात करून बोर पिंकांचे उत्पादन घेतले जातात, 60 एकर क्षेत्रावर विविध प्रकाराचे वाण आहे, थायलंड येथील अँपल वाण, पंजाब राज्यातील सुधारीत वाण म्हणून उमराण, कडाका, चमेली आहेत, तसेच बोरा पासून पवार यांनी विविध पदार्थ बनवले आहेत वेपर्स, चिवडा, बोर पावडर, बोर खजूर, बनवले आहेत, बोर विक्री बाहेरील राज्यात व्यापारी मार्फत व तसेच स्थानिक व्यापारी आठवडे बाजारात करतात, मोठ्या प्रमाणावर बाहेरील राज्यात विक्री होत असते बोरांच्या विक्रीतून वर्षभरात तब्बल 1 कोटी रुपयांचे उत्पादन पवार कुटूंबीय सुयोग्य व्यवस्थापन करून घेतात. अनेक प्रदर्शनात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक माऊली बोरानां मिळाले आहे, दिल्ली येथील भव्य देशस्तरीय प्रदर्शनामध्ये माऊली बोर हे देशातील प्रथम क्रमांकाचे बोर म्हणून घोषित करण्यात आले होते.
अनेक कृषी विद्यापीठांचे कुलगुरू कृषी विभागाचे अनेक अधिकारी पदाधिकारी यांनी समक्ष बोरीच्या, बागेला भेटी दिल्या आहेत, राज्यातील परराज्यातील शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत, संपूर्ण बागेला ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून पाणी देण्यात येते, बोर फळ संपल्यानंतर त्या झाडाची छाटणी करून ती लाकडे विकण्यात येतात, जवळपास तब्बल दहा हजार झाडांवर हा विशाल प्रयोग आहे, क्षारयुक्त व चुनखडीयुक्त जमीन असून शेकडो टन उत्पादन घेत आहेत. अल्प पाण्यात यशस्वी व उत्पादनक्षम शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना कृषीभूषण माऊली पवार यांचा बोर शेतीचा प्रयोग दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक असा आहे.
माऊली बोरांची चव मा केंद्रीय कृषी मंत्री बलराम जाकड, माजी मंत्री बाळासाहेब थोरात,माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे,माजी कृषी मंत्री स्व गोविंदराव आदिक,माजी खा यशवंतराव गडाख,स्व मारुतराव घुले,माजी मंत्री रामदास कदम,जेष्ठ साहित्यीक बाबा भांड, माजी आ डॉ सुधीर तांबे आदींनी चाखली आहे. बोर पिकांचे व्यवस्थापन नियोजन स्वतः कृषिभूषण माऊली पवार, त्याचे चिरंजीव मा सरपंच साहेबराव पवार, निवृत्ती पवार, सुनील पवार, नातु सागर पवार, अजिंक्य पवार, नितीन पवार पाहतात तर पवार यांचा एक मुलगा पंचवीस वर्षापासून अमेरिका येथे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे.
पवार यांना जिल्हा परिषद अहमदनगर तर्फे 1995 ते 1996 कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2003 मुख्यमंत्री वसंतराव नाईक कृषीभुषण पुरस्कार, 2018-2019 मध्ये जनकल्याण फाऊंडेशन तर्फे संत तुकडोजी महाराज पुरस्कार, 2019 आदर्श शेतकरी पुरस्कार, 2019 कृषिरत्न पुरस्कार, 2022 समाजरत्न पुरस्काराने प्रयोगशील शेतीसाठी सन्मानित करण्यात आले आहे.
वडिलोपार्जित शेती मधून नाविन्यपूर्ण प्रयोग करावा, तसेच कमी पाणी व क्षारयुक्त जमिनीला उत्कृष्ट पर्याय म्हणून मी बोर या फळ शेती कडे गेलो, व त्यात पूर्ण स्वतः व कुटुंबाला उतरून काम करू लागलो, त्यात मला यश मिळत गेले.
नव्याने शेती करू इच्छिणाऱ्या तरुणांना शेती किफायतशीरपणे करता येते याचे मॉडेल उभे करता आले याचा मनस्वी आनंद आहे.
– कृषिभूषण माऊली पवार, पुनतगाव, माजी सरपंच
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.