सोनई –आर्ट ऑफ लिव्हिंग बेंगलोर आश्रम येथे प्रथमच वारकरी संप्रदायाचा किर्तन महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न
या सोहळ्यासाठी ह.भ प. विश्वनाथ गिरी महाराज, ह.भ प. विकास महाराज बनसोडे यांच्या प्रवचन रुपी व किर्तन सेवेतुन सोहळा संपन्न झाला विश्वनाथ गिरी महाराज व विकास महाराज बनसोडे यांनी आपल्या रसाळ वाणीतून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर महाराज यांच्या हस्ते किर्तनकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी स्वामी प्रणव , स्वामी ऋषीं देवव्रत ,आर्ट ऑफ लिव्हींग टीचर पवन सरगय्ये आदी उपस्थित होते.
श्री श्री रविशंकर दिंडी सोहळा मरकळ आश्रम साधक तसेच श्रीरामपुर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग टिचर रचना दिदी यांनी या सोहळ्याचे नियोजन केले होते व प.पू.विश्वंनाथगीरी महाराज यांनी गुरूदेव श्री श्री रविशंकर यांना श्री संत बहिरा जात संस्थान घोगरगाव ता नेवासा येथे भेटीसाठी आमंत्रित केले. बहिरा जातवेद आश्रम ही भूमी मोठी अध्यात्मिक भूमी असून तेथे भेट देण्यासाठी येणार असल्याचे श्री श्री रवीशंकर महाराज म्हणाले व घोगरगाव आश्रमात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती घेतली.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.