नेवासा – नेवासा तालुक्यात बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेले क्रीडा संकुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी मराठा समाज सेवा संस्थेने केली आहे. याबाबत आमदार विठ्ठलराव लंघे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी करण्यात आली.
नेवासा खुर्द येथील क्रीडा संकुलाची जागा योग्य नसल्याचा अभिप्राय खेळाडू व क्रीडाप्रेमीं मार्फत प्राप्त झाल्याने नवीन जागेची मागणी नेवासा तहसीलदारांना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे. नेवासा येथे क्रीडा संकुल व्हावे अशी अनेक दिवसांपासून क्रीडाप्रेमींची इच्छा आहे. या संकुलामध्ये जलतरण तलाव, इनडोर स्टेडियम, जॉगिंग पार्क, व्यायाम शाळा, क्रिकेट मैदानं, व्हॉलीबॉल, कबड्डी,कुस्ती अशा अनेक विविध सोयी उपलब्ध होणार आहेत.
मराठा समाज सेवा संस्था या कामी पाठपुरावा करत असून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आमदार विठ्ठलराव लंघे यांना भेटून क्रीडा संकुल होण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी केली असता क्रीडा संकुलाच्या कामी लवकरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून चर्चा करणार असल्याचे आमदार लंघे यांनी सांगितले. मराठा समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष अॅड. संभाजी पवार, अॅड. अशोक करडक, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक वाकचौरे, बाळासाहेब भदगले, माजी जि. प. सदस्य दिलीप वाकचौरे, डॉ. संतोष लांडे, शशिकांत मतकर, अविनाश सोनवणे, अॅड. संदीप शिंदे, अॅड. मनोज हारदे आदी उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.