नेवासा – नेवासा येथील ज्ञान फाउंडेशन व पसायदान स्पोर्टस् क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे या वर्षीही भव्य डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन २५ फेब्रवारी ते १ मार्च दरम्यान आयोजित केले आहे. या स्पर्धेमध्ये मोठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली असून या स्पर्धेत क्रिकेट संघांनी भाग घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे
स्पर्धेमध्ये प्रथम विजेत्या संघाला १ लाख रुपयांचे तर व्दितीय संघाला ७१ हजार तर तृत्तीय संघाला ५१ आणि चौथे बक्षिस ३५ हजार तर सहावे बक्षिस १५ हजार ठेवण्यात आलेले आहे. या स्पर्धा नेवाशाच्या होम ग्राऊंडवर आयोजित केल्या असून या स्पर्धेचा क्रिकेट रसिकांना आयपीएलसारखा आनंद लुटता येणार आहे. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ योजनेचे आयोजनही करण्यात आलेले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.