नेवासा – नेवासा तालुका सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने दर सोमवारी नेवासा शहर व नेवासा फाटा परिसरातील सर्व सराफ दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय सुवर्णकार संघटनेच्या नेवासा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय दहिवाळकर यांनी दिली.
नेवासा तालुका सराफ सुवर्णकार संघटनेची बैठक तालुकाध्यक्ष विजय दहिवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नेवासा येथे झाली. यावेळी सराफ बांधवांच्या विविध प्रश्नांवर व अडीअडचणींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
आठवड्यातील एक दिवस सुवर्णकारांची दुकाने सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन संत नरहरी महाराजांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष दहिवाळकर यांनी दिली. बैठकीस तालुक्यातील सराफ सुवर्णकार बांधव उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष दहिवाळकर यांनी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच संघटनेचे सर्व पदाधिकारी एकत्रित येऊन एक दिवशीय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून हाच निर्णय तालुक्यातही घेण्यात येणार आहे. सराफ सुवर्णकार संघटनेला बळकटी देण्याचा माझा मानस असल्याचे अध्यक्ष दहिवाळकर यांनी सांगितले. यावेळी सुवर्णकार बांधव उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.