नेवासा – युवा सेनेच्या वतीने नेवासा तालुक्यातील फत्तेपूर शिवारात असलेल्या शरणपूर वृद्धाश्रमात अन्नदान करून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे चिरंजीव व युवा सेनेचे नेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.युवा सेनेचे नेते शुभम उगले यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. शरणपूर वृद्धाश्रमात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित वृद्ध माता पित्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दीर्घायुषी व निरोगी आरोग्यदायी जीवनासाठी प्रार्थना केली.युवा सेनेचे नेते शुभम उगले यांच्या उपस्थितीत झालेल्या अन्नदान कार्यक्रम प्रसंगी शरणपूर वृद्धाश्रमाचे चालक व समाजसेवक रावसाहेब मगर यांनी वृद्धाश्रमात तीस महिला पुरुष वृद्ध वास्तव्य करत असून स्वबळावर चालणाऱ्या वृद्धाश्रमाला शासकीय पातळीवर अनुदान मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
युवा सेनेचे नेते शुभम उगले यांनी वृद्धाश्रमासाठी शासकीय पातळीवर लाभ देण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व युवा नेते श्रीकांत शिंदे यांना भेटून प्रयत्न करू आपण पाठपुरावा करावा अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली. महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी फार मोठे योगदान दिले असून त्याच पद्धतीने राज्यातील युवकांना संघटित करण्याचे डॉ.श्रीकांत शिंदे करत असल्याचे सांगत अहिल्यानगर जिल्हयातूनही युवकांची मोठी ताकद युवा सेनेच्या माध्यमातून उभी करू असा निर्धार शुभम उगले यांनी यावेळी बोलतांना केला. यावेळी उपस्थित वृद्धांना अन्नदानाद्वारे मिष्टान्न भोजन देण्यात आले. युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमाचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.वृद्धाश्रम व्यवस्थापक संतोष मगर यांनी अन्नदान करणारे युवा नेते शुभम उगले व पदाधिकारी यांचे आभार मानले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.