ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
ट्रक

गणेशवाडी – पांढरीपुल येथे दोन हाॅटेल मध्ये एक ट्रक आरपार घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये एक मयत झाल्याचे वृत्त आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की अहिल्यानगर मार्गे संभाजी नगर कडे भरधाव वेगात एक मालवाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम एच ४१ जि. ७०१७ हा जात असताना पांढरीपुल येथे पहाटे पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास महामार्गा लगत असणाऱ्या हाॅटेल मातोश्री मध्ये घुसला तो जवळ असलेल्या राधेश्याम हाॅटेल मध्ये येऊन थांबला. पहाटे ची वेळ होती हाॅटेल मालक बंडु गणपत भवार वय.५० रा. पांढरीपुल हे नेहमी प्रमाणे आपल्या हाॅटेल मधील सामानाची आवराआवर करत असताना ते या अपघात सापडून जागीच ठार झाले. या अपघाता मध्ये दोन ही व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

ट्रक

अपघाताचे वृत्त समजताच सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी त्यांचे सहकारी पो. हे. काॅ, रामदास तमनर, पो. हे. काॅ. रवी गर्जे, पो. हे. काॅ. आप्पा तमनर चालक वजीर शेख हे तातडीने घटनास्थळी हजर झाले. अपघातात जखमींना तातडीने अहिल्यानगर येथे जिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करत वाहतूक सुरळीत केली. पांढरी पुल येथे अपघातांची मालिका नेहमीच सुरू असते अपघात झाला म्हणजे नको पोलीसांची ससेमिरा मागे म्हणून लोक मदती ऐवजी फक्त बघ्यांची भुमिका घेतात परंतु या ठिकाणी सदैव तत्पर असणारे आदिनाथभाऊ काळे, सोमनाथ हारेर, बद्रीनाथ खंडागळे हे या ठिकाणी होणाऱ्या अपघातग्रस्तांना नेहमीच मदतीचा हात देत असतात , त्यांना पुढील औषधोपचारा कामी पाठवत असतात.

ट्रक
ट्रक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

ट्रक
ट्रक
ट्रक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

ट्रक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!