विद्यार्थ्यांना मिळणार मसाले भात, व्हेज पुलाव, अंडा पुलाव
नेवासा – राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आता मध्यान्ह भोजनात व्हेजिटेबल पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, अंडा पुलाव सोबतच गोड खिचडी, – नाचणीचे सत्व मिळणार आहे. यापूर्वी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासंदर्भात तक्रारी आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने आहार पद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविध १२ प्रकारच्या पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे.
केंद्र पुरस्कृत पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारांचा लाभ देण्यात येतो. या योजने अंतर्गत पहिली ते पाचवीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच सहावी व आठवीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार तसेच तांदळापासून बनविलेल्या पोषण आहाराचा लाभविद्यार्थ्यांना देण्यात येत होता.
तथापि, आता या आहारात बदल करून गेल्या वर्षी जून २०२४ मध्ये विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात विविधता आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार पध्दतीप्रमाणे म्हणजेच तांदूळ, डाळी / कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर आणि नाचणीसत्व यांचा समावेश करण्यात आला. परंतु, हा आहार देताना विविध अडचणी येत असल्यामुळे सदर पाककृतींमध्ये सुधारणा करण्यासाठी लोकप्रतिनिधी, केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे आहाराचा पुरवठा करणाऱ्या नागरी भागातील संस्था, बचत गट, योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या संघटनांची निवेदने राज्य सरकारला प्राप्त झाली होती. या मागण्यांचा विचार करून तसेच प्रतिदिन, प्रती विद्यार्थी आहार खर्चाची मर्यादा विचारात घेता, विद्यार्थ्यांच्या आहार पध्दतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात व्हेजिटेबल पुलाव, सोयाबीन पुलाव, मसाले भात, मसुरी पुलाव, मटार पुलाव, मूग, शेवगा वरण भात, मूगडाळ खिचडी, मोड आलेल्या मटकीची उसळ, चवळी खिचडी, अंडा पुलाव, चणा पुलाव, गोड खिचडी आणि नाचणी सल्ब अश-१-२ प्रकारच्या पाककृतींच्या • समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारात वैविध्यता आणण्याच्या दृष्टीने हे पदार्थ वेगवेगळ्या दिवसासाठी निश्चित केले जाणार आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.