नेवासा – सोनई येथील रमेश खंडुजी सुद्रिक (वय ५७) हे मंगळवार दि. २८ पासून बेपत्ता असल्याची खबर सोनई पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी प्रवरासंगम येथे नदीत त्यांचा मृतदेह सापडला. याबाबत माहिती अशी, सुद्रिक हे सायंकाळी घरी न आल्याने कुटुंबियांनी त्यांच्या मित्रांना विचारपूस केली, याबाबत कोणालाच माहिती नसल्याने सर्वानी शोध घेण्यास सुरुवात केली. सोनईसह परीसरात शोध घेतला असता ते कुठेही आढळून आले नाही.
प्रवरासंगम येथे गाडी असल्याची माहिती मिळाल्याने कुटुंबियांनी तेथे धाव घेतली असता, तेथे गाडी व जवळील साहित्य सापडले असल्याची माहिती मिळाली आहे. प्रवरासंगम पुलावर गाडी असल्याने मंगळवार सकाळपासून नदीत शोध घेतला जात होता. शुक्रवारी सकाळी गोदावरी नदीत त्यांचा मृतदेह सापडला असून नेवासा येथे शवविच्छेदन करण्यात आले. नंतर दुपारी शोकाकुल वातावरणांत सोनईत अंत्यविधी करण्यात आला. मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. सुद्रिक यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.