नेवासा – अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे जानेवारी २०२५ महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने मानधन व प्रोत्साहन भत्त्यापोटी २३९.०८ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे मानधन वेळेत देता यावे यासाठी अपर मुख्य सचिवांच्या (वित्त) अध्यक्षतेखाली २ जून २०१७ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम केंद्रीय सहाय्य यांच्याकडून प्राप्त होत असली तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे जानेवारी २०२५ या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी एकूण २३९.०८ कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.