डॉ. सुरेश बेल्हेकर, डॉ. रंजना बेल्हेकर, अभिषेक बेल्हेकर यांनी केले कौतुक
नेवासा फाटा – भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्था संचालित ज्ञानेश्वर पॉलिटेक्निकचा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण बोर्ड मुंबई बोर्डाने निकाल जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांची हिवाळी २०२४ परीक्षा ही ऑफलाईन एमएसबीटीई पद्धतीने घेतली. या परीक्षेत बेल्हेकर संस्थेचा उत्कृष्ट निकाल लागला आहे.
सर्व विभागातून तृतीय वर्षातील संगणक विभागातून किसन शिंदे (८७.२२ टक्के) याने प्रथम क्रमांक पटकावला तर ईश्वरी सांगळे (८६ टक्के) हिने द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच प्रथम वर्षातील मेकॅनिकल विभागातून किरण जाधव (८४.१२ टक्के) याने तृतीय क्रमांक मिळविला आहे. ज्ञानेश्वर पॉलिटेक्निकने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विभागीय निकाल खालीलप्रमाणे संगणक विभागात प्रथम वर्षातील श्रृतिका साळवे (८२.४७ टक्के), प्रथम वर्षातील स्वाती सत्तवन (८०.५९ टक्के) आणि अंजली घोडेचोर (८० टक्के).
इलेक्ट्रॉनिक्स विभागात द्वितीय वर्षातील शिवम जाधव (८१.११ टक्के), तृतीय वर्षातील सुभाष वैरागर (७७.५८ टक्के) आणि महेश गवळी (७७.०५ टक्के), स्थापत्य विभागात तृतीय वर्षातील दिव्या गायकवाड (८०.५० टक्के), तृतीय वर्षातील ओम काळे (७९.४० टक्के) आणि द्वितीय वर्षातील अनिता धनवडे (७८.८१ टक्के), मेकॅनिकल विभागात प्रथम वर्षातील किरण जाधव (८४.१२ टक्के), प्रथम वर्षातील प्राजक्ता कुटे (८१.८८ टक्के) आणि द्वितीय वर्षातील एमडी साहानुल्ला (७८.११ टक्के) गुण मिळाले आहेत.
सर्व विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा. राजेंद्र घुले, प्रा. सुदर्शन शिंदे, प्रा. विनोद भालेकर, प्रा. योगेश मानळ, प्रा. शारुख पठाण, प्रा. अजय बाविस्कर, प्रा. कांबळे, प्रा. कमानदार, प्रा. भंगे, प्रा. ऊनवणे, प्रा. भिसे, प्रा. शिंदे, प्रा. खुळे, प्रा. पागिरे, प्रा. कुंधारे, प्रा. शेंडगे, आदींचे मार्गदर्शन लाभल्याचे प्राचार्य एच.जे. आहिरे यांनी सांगितले. ज्ञानेश्वर पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन) मधील सर्व प्राध्यापक हे अनुभवी व उच्चशिक्षित असून त्याचा पूर्ण वेळ हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध केला आहे.
ज्ञानेश्वर पॉलिटेक्निक प्रशस्त इमारतीसोबतच अद्यावत असे कॉम्पुटर सेंटर, ग्रंथालय, इंटरनेट, स्वतंत्र होस्टेल, भव्यदिव्य वर्कशॉप अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना शंभर टक्के नोकरीची हमी मिळण्यासाठी ट्रेनिंग पेल्समेंट विभाग कार्यरथ आहे. संस्थेचे अध्यक्ष संस्थापक डॉ. सुरेश बेल्हेकर, संचालिका डॉ. रंजना वेल्हेकर, अभिषेक वेल्हेकर आणि प्राचार्य एच.जे. आहिरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.