ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
क्रेडीट कार्ड

नेवासा – किसान क्रेडीट कार्डची मर्यादा पूर्वी ३ लाखांपर्यत होती. विनातारण शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं. त्यांची मर्यादा आता ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच शेतकऱ्यांनी खूश करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. किसान क्रेडिट कार्ड ही केंद्र सरकारची. योजना असून छोट्या शेतकऱ्यांसाठीं ती वरदान ठरली आहे. याद्वारे, शेतकऱ्यांना विनातारण १.६ लाख रुपयांचं कर्ज मिळू शकतं, तर तीन वर्षांत यातून पाच लाखांपर्यंत कर्ज शेतकरी घेऊ शकतात. यासाठी वार्षिक चार टक्के व्याजदर आकारण्यात येतो. मात्र, या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीत – खातं खोलणं गरजेचं आहे

क्रेडीट कार्ड

कसा मिळतो ४ टक्के व्याजदराचा फायदा ?
किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकरी ५ वर्षांत ५ लाखांपर्यंत अल्पमुदतीतील कर्ज घेऊ शकतात. या कार्डसाठी ९ टक्के इतका वार्षिक व्याजदर आहे. मात्र, सरकार यावर २ टक्के अनुदान देतं, त्यामुळे हा व्याजदर ७ टक्के होतो. त्याचबरोबर जर शेतकऱ्यानं या कर्जाची वेळेत परतफेड केली तर त्याला ३ टक्क्यांची आणखी सूट मिळते. म्हणजेच शेतकऱ्याला त्याचं कर्ज हे केवळ ४ टक्के व्याजदरानेच उपलब्ध होतं.

क्रेडीट कार्ड

विम्याचे मिळतात हे फायदे
किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी अल्पमुदतीचं कर्जाशिवाय पशु, मत्स्यपालनासाठीही कर्ज मिळेल. त्याशिवाय क्रेडिट कार्डसोबत दोन लाखांचं विमा कवचही उपलब्ध आहे. विम्यासाठी २२ ते ३३० रुपयांचा माफक हप्ता भरावा लागतो. या कार्डसोबत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत अपघाती विमाही – मिळतो. युरीया प्रकल्प आसाममध्ये उभारण्यात येणार आहे. तसंच पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेअंतर्गत १ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. डाळींसाठी ६ वर्षांची आत्मनिर्भरता योजना लागू. यात फळ आणि भाजी उत्पादकांवर विशेष लक्ष असणार आहे. योजनेअंतर्गत १०० जिल्ह्यावर लक्ष देणार. उत्पादन वाढवणं आणि वितरण करणे यावर सुद्धा सरकारचे विशेष लक्ष असणार आहे. खाण्याचे उत्पादन वाढवणार असे देखील अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे.

क्रेडीट कार्ड

कापूस उत्पदनाबर सुद्धा बिशेष… लक्ष देणार आहे. कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी पाच वर्षांचे विशेष अभियान राबवले जाणार असून कापसाच्या विविध जाती विकसित करणार. आत्मनिर्भर इन एडिबल ऑईल, सीड्ससाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. तर डाळी आणि खाद्यतेलात स्वयंपूर्णता आणून तूर, आणि मसूरवर विशेष लक्ष केंद्रित करून डाळींमध्ये स्वयंपूर्णतेसाठी ६ वर्षांचे अभियान राबवल्या जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

क्रेडीट कार्ड
क्रेडीट कार्ड
क्रेडीट कार्ड

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

क्रेडीट कार्ड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!