गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील चांदा येथे लोखंडी कत्तीने झालेल्या मारहाणीत एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार चांदा येथील इरशाद कदीर शेख वय. ३४ रा. चांदा हे दि. १ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या घरासमोर ऊभे असताना अश्पाक बाबा शेख, मुस्ताक मन्सूर शेख, तौसीफ शकील शेख, अदनान अश्पाक शेख, सर्व राहणार चांदा हे सर्व जण त्याठिकाणी आले व काही एक कारण नसताना मला वाईट शिवीगाळ करत लाथा बुक्यांनी तसेच लोखंडी कत्तीने मारहाण केली.
![मारहाण](https://annews.co.in/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Image-2025-01-03-at-11.49.34-1024x1024.jpeg)
तु जर परत आमचे नादी लागला तर तुला जिवंत ठार मारून टाकु असा धम दिला असल्याचे दि. २ रोजी दाखल असलेल्या फिर्यादी मध्ये म्हटले आहे. सोनई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादी वरुन गुन्हा र. नं. २३/२०२५ बिएनएस चे कलम ११८(१), ११५(२), ३५२,३५२(२) (३), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एम. आर. आडकित्ते हे करत आहेत.
![मारहाण](https://annews.co.in/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-01-23-at-10.05.06-766x1024.jpeg)
![मारहाण](https://annews.co.in/wp-content/uploads/2022/01/IMG_20220116_145632-1024x378.jpg)
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
![मारहाण](https://annews.co.in/wp-content/uploads/2020/09/telegram-invite.png)
![मारहाण](https://annews.co.in/wp-content/uploads/2025/01/WhatsApp-Image-2025-02-02-at-5.37.27-PM-1024x1020.jpeg)
![मारहाण](https://annews.co.in/wp-content/uploads/2020/08/photo6147886037003776927.jpg)
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.