नेवासा – नेवासा येथील ज्ञानोदय इंग्लिश मीडियम स्कूल येथे बाल विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. अलका जंगले होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर जोजार, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, माजी मुख्याध्यापक पंडितराव खाटीक, बापूसाहेब चव्हाण, प्राचार्य रावसाहेब चौधरी, प्राचार्य स्मिता पानसरे, पर्यवेक्षक बाळासाहेब पवार, पर्यवेक्षिका सुनीता दिघे,
कानिफनाथ जाधव आदी उपस्थित होते. यावेळी अॅड अलका जंगले, प्राचार्य रावसाहेब चौधरी, पर्यवेक्षक बाळासाहेब पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी, सर्व शिक्षकांनी तसेच शिक्षिका अंजली देशमुख, रोहिणी धानापुणे, पूजा सोनवणे, अश्विनी मरगळ, शुभांगी चौधरी, भाग्यश्री अकोलकर, शोभा चौधरी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अर्चना कोरडे व संजय आखाडे यांनी केले. तर आभार मोनिका शिंदे यांनी मानले.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.