ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
पोलिस

नेवासा – नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा फाटा येथे १ नोव्हेंबर २०२४ रोजी कारच्या धडकेत मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून कोणाला माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन नेवासा पोलीस ठाण्याच्यावतीने करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा फाटा येथे नगर- संभाजीनगर रोडवर हुंदाई कंपनीच्या कारने (एमएच १२ यूव्ही ३२३६) अंदाजे ४० ते ५० वर्षे वयाच्या पुरुषास धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. कारचालक मृत्यूंजय रघुनाथ मोहितकर (वय ६८) रा. हडपसर रोड पुणे याच्यावर पोलीस ठाण्यात अपघात करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस

मयताच्या मृतदेहाचा दफनविधी करण्यात आला. वारसाचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांनी.. डीएनए सॅम्पल राखून ठेवला आहे. अंगात गुलाबी रंगाचा हाफ बाह्यांचा टी शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅण्ट, अर्धवट टक्कल, रंग सावळा, दाढी-मिशी वाढलेली, चेहरा उभट अशा वर्णनाच्या सदर मयत व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास नेवासा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, उपनिरीक्षक मनोज आहिरे यांनी केले आहे.

newasa news online
पोलिस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलिस
पोलिस
पोलिस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलिस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!