शहर काँग्रेस नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभा
नेवासा – नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाने नेवासा शहरात अतिक्रमण संबंधात शहरातील व्यापाऱ्यांना नोटीसा बजावल्या आहे यात शहर काँग्रेसचा हवाला दिला असून तो चुकीचा आहे असे मत नेवासा काँग्रेसचे शहराध्यक्ष अंजुम पटेल यांनी व्यक्त केले तर अतिक्रमण काढण्याशी शहर काँग्रेसचा काहीही संबंध नसून उगीच अतिक्रमणशी शहर काँग्रेसचा सबंध जोडू नये असे स्पष्ट केले.
नेवासा तालुक्यातील अतिक्रमण काढा या मागणीसाठी काही दिवसापूर्वी नेवासा येथे आंदोलन करण्यात आले होते यावेळी आपल्या स्वार्थासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास मोजणी न करता सरसकट अतिक्रमण काढा अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. यावर नेवासा शहर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेत सार्वजनिक बांधकाम विभाग उपाभियंता यांची भेट घेत कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या हद्दीच्या बाहेर नियमबाह्य अतिक्रमण काढू नये असे स्पष्ट करत. नियमबाह्य अतिक्रमण काढण्यास आमचा तीव्र विरोध आहे असेही स्पष्ट केले. तर नेवासा शहरातील अतिक्रमण अनेकदा काढण्यात आले असून रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
त्यामुळे शहरातील अतिक्रमण काढण्यास शहर काँग्रेसचा विरोधच राहील हे देखील स्पष्ट केले.शहर काँग्रेस व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून व्यापाऱ्यांना आता कुठलाही त्रास देऊ नये असे स्पष्ट केले. यावेळी शहराच्या अतिक्रमण बाबतीत उपअभियंता यांना निवेदन देत शहरातील अतिक्रमण काढण्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करत शासकीय नोटीस सारख्या कामात आमच्या पक्षाचा उल्लेख करू नये असे स्पष्ट केले. निवेदनवेळी काँग्रेस शहराध्यक्ष अंजुम पटेल, प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे, उपाध्यक्ष कैलास बोर्डे, सचिन गायकवाड, संतोष ससाणे, अशफाक पटेल, अशोक वाघ, आदी उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.