नेवासा – राज्यातील जवळपास अंशतः आणि विनाअनुदानित तीन हजार शाळा, १५ हजार तुकड्यांना वाढीव २० टक्क्यांचे टप्पा अनुदान मार्च २०२५ पर्यंत अपेक्षित आहे. मात्र, आर्थिक वर्ष संपायला दोन महिनेच शिल्लक आहेत. तरीदेखील वाढीव टप्पा अनुदानासाठी निधी मिळाला नसल्याने सुमारे ५१ लाख शिक्षक पगारवाढीच्या प्रतिक्षेत आहेत. सेवक संच रखडल्याने व सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने शिक्षण खात्याकडून निधीसीठी प्रस्तावच पाठविण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.
तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्च २०१३ मधील निर्णयानुसार राज्यातील ३४२७ अंशतः व विनाअनुदानित शाळा व १५ हजार ५७१ तुकड्यांना वाढीव टप्पा अनुदानासाठी ११६० कोटी रुपये अनुदान देणे अपेक्षित होते. पण चालू २०२४-२५ या आर्थिक वर्षात सुमारे ५१ लाख-शिक्षक वाढीव टप्पा अनुदानासाठी कधी निधी मिळणार याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांचे चालू शैक्षणिक वर्षात सेवकसंच देखील अजूनपर्यंत झालेला नाही. त्यामुळे त्यांना आता पुढच्याच आर्थिक वर्षात वाढीव टप्प्यासाठी निधी मिळेल, असे सांगण्यात येते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.