नेवासा – महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सामन्यानंतर पंचांसोबत घातलेली हुज्जत आणि पंचांना केलेली मारहाण शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना भोवली. या दोन्ही मल्लांच्या कुस्तीवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आलीय. शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ या दोघांच्या कुस्तीतील निर्णय पंचांनी चुकीचा दिला आणि दाद मागायला गेल्यानंतर चांगला प्रतिसाद न देता शिवीगाळ झाल्यामुळे सगळा प्रकार घडल्याचं शिवराज राक्षे यांनी म्हटलंय.
घडलेला प्रकार हा चुकीचा आहे आणि माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत मी न्यायालयात दाद मागणार असल्याचंही शिवराज राक्षेने म्हटलंय दरम्यान, माजी महाराष्ट्र केसरी विजेता चंद्रहार पाटलांनी वादग्रगस्त विधान केलंय. शिवराज राक्षेनी पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या असं वादग्रस्त विधान चंद्रहार पाटील यांनी केलंय. २००९ मध्ये पंचांच्या निर्णयाचा बळी ठरलो. पंचांनी अन्याय केला, असा आरोप देखील चंद्रहार पाटलांनी केलाय.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.