बेलपिंपळगाव – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील शिवनेरी ग्रुप चे उपाध्यक्ष गणेश डुकरे हे श्रीरामपूर वरून घरी येत असताना टाकळीभान ते बेलपिंपळगाव रोड वरती त्यांना रोडच्या कडेला एक पडलेले पॉकेट सापडले त्यांनी ते घेतले असता उचकून बघितले असता त्यामध्ये रोख स्वरूपात काही पैसे घरातील सर्वांचे आधार कार्ड पॅन कार्ड गाडीचे आरसी बुक ड्रायव्हिंग लायसन व बँकेचे एटीएम कार्ड होते डुकरे यांनी आधार कार्ड वरील नाव बघता सदर पॉकिटे श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील राजेश काळे यांचे असल्याचे समजले त्यांनी भोकरला आपल्या मित्रांकडे चौकशी करून निरोप दिला काळे यांनी बेल पिंपळगाव ला येऊन सदर पॉकेट ताब्यात घेतले.
काळे हे बेलपिंपळगाव येथे आपल्या पाहुण्याकडे दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी येत असताना मोबाईल काढण्याच्या नादात सदर पॉकेट पडल्याचे सांगितले व ते लक्षातही आले नाही परंतु जगात अजूनही प्रामाणिकपणा आहे याचे आज उदाहरण मिळाले डुकरे यांनी हे पॉकेट याचे गावातून त्यांच्या मित्रमंडळींनी मोठे कौतुक केले व काळे यांनी देखील त्यांच्या आभार मानले
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.