पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील पुरोहित अशोक काका कुलकर्णी यांना नुकतेच अकोला जिल्हा अहील्यानगर येथे श्री सोमेश्वर देवस्थानच्या मूर्ती प्रतिष्ठा कार्यक्रमांमध्ये धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक म्हणून जगद्गुरु शंकराचार्य संकेश्वर करवीर , कोल्हापूर पिठा तर्फे धर्मभूषण या उपाधीने सन्मान करण्यात आला. अशोककाका कुलकर्णी स्वतःचा शेती व्यवसाय सांभाळून धर्मजागृतीचे काम करत आहेत . व धर्म संबंधित माहिती सर्वांसाठी प्रसारित करत आहेत. याची नोंद घेऊन शंकराचार्य पिठातर्फे त्यांचा सन्मान करून धर्मभूषण या उपाधीने गौरविण्यात आले.
पंडित जगदीश महाराज जोशी , अध्यक्ष स्थानिक तीर्थपुरोहित संघ त्र्यंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला . श्रीमद शंकराचार्य व अशोककाका कुलकर्णी यांची शोभायात्रा अकोले शहरातून काढण्यात आली होती . त्यासाठी भजनी मंडळ , लेझीम मंडळ व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते . या प्रसंगी अकोल्याचे आमदार डॉ किरणजी लहामटे व असंख्य भाविक जनसमुदाय उपस्थित होता. त्यांना या धर्मभूषण उपाधीने सन्मानित करण्यात आल्याबद्दल,परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.