ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
अर्बन बँक

नेवासा – डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशनची परवानगी मिळाली तर नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना ११० कोटी रुपयांचे वाटप करणे शक्य होणार असून, पाच लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवींच्या प्रमाणात ५० टक्के रक्कम मिळणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रशासन आणि ठेवीदार समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला असल्याची माहिती बँक बचाव कृती समितीच्यावतीने मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, अॅड. अच्युत पिंगळे, डी. एम. कुलकर्णी, मनोज गुंदेचा, विलास कुलकर्णी, अवधूत कुक्कडवाल आदी उपस्थित होते. दरम्यान, डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशनने बँकेच्या पाच लाखांच्या आतील ठेवीदारांना त्यांचे पैसे दिले असल्याने त्याची परतफेडीची सर्व ३७९ कोटी १२ लाखांची रक्कम बँकेने डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशनला परत केली आहे.

अर्बन बँक

त्यामुळे आता पाच लाखांपुढील ठेवी ठेवीदारांना परत करण्यासाठीचा ना-हरकत दाखला डिपॉझिट कॉर्पोरेशनकडून मिळवण्याचा प्रयत्न असून, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती बँकेचे प्रशासक गणेश गायकवाड यांनी पालकमंत्री विखे पाटील यांना बैठकीत दिली असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. बैठकीत बँकेचे अवसायक गायकवाड यांनी लेखी आक्रडेवारी पालकमंत्री विखे पाटील यांना सादर करताना बँकेत पाच लाखाच्या पुढे रक्कम ठेव म्हणून ठेवलेल्या ठेवीदारांना ५० टक्के रक्कम म्हणजे ११० कोटी रूपये साधारणपणे मार्च वा एप्रिलमध्ये वाटप होवू शकते व यासाठी आवश्यक असलेले डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशनचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले,

अर्बन बँक

ठेवीदारांचे २२० कोटी देणे असून, त्यापैकी ५० टक्के म्हणजे ११० कोटी डिपॉझीट कॉर्पोरेशनच्या परवानगीने तातडीने दिले जातील तसेच उर्वरित ११० कोटीचे वाटप लवकर करण्यासाठी काही कर्जदारांच्या मालमत्ता तातडीने ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. मोठ्या कर्जदारांवर पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई झाली तर ती रक्कम देखील लवकरच ठेवीदारांना मिळेल, असे बँक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आल्यावर पालकमंत्री विखे यांनी तातडीने त्रिसदस्यीय समिती स्थापन करून व या समितीच्या माध्यमातून सर्व कारवाई जलद वेगाने करून ठेवीदारांना ठेवी लवकरच पूर्ण परत करण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहे, असेही पत्रकार परिषदेत सांगितले गेले.

अर्बन बँक
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अर्बन बँक
अर्बन बँक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अर्बन बँक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!