नेवासा – नेवाशाचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज भगवंताचा यात्रा उत्सव व त्यानिमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व कीर्तन सोहळ्यास आज बुधवार दि. ५ फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. ५ ते ११ फेब्रुवारीपर्यंत वैभवीश्री (वृंदावन) यांचे कथा निरुपण होईल. १२ फेब्रुवारी रोजी श्रीमद भगवत्गीता व विष्णूसहस्त्रनाम सामूहिक पठण सकाळी ८ ते १० या वेळेत होईल.
रात्री ९ वाजता भळंद, दि. १३ रोजी पहाटे तहसीलदार यांच्या हस्ते विधिवत मानाची पूजा, श्री मोहिनीराज उत्सव मूर्तीचे सवाद्य मंगल कार्यालयाकडे प्रस्थान. १३ ते १६ फेब्रुवारीपर्यंत दररोज सायंकाळी ६ वाजता महाप्रसाद पंगत. १३ ते १६ फेब्रुवारीपर्यंत दररोज रात्री नम्रताताई व्यास निमकर यांचे कीर्तन, १७ फेब्रुवारी पहाटे वडार समाजाच्यावतीने प्रवरासंगम वरून आणलेल्या कावडीने जलाभिषेक, महाप्रसाद, १८ फेब्रुवारी रोजी कुस्त्यांचा हंगामा होईल.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.