नेवासा – भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी पदांसाठी तब्बल ३२ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. या मेगा भरतीसंदर्भात भारतीय रेल्वेकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांना येत्या २२ फेब्रुवारीपर्यंत भारतीय रेल्वे अंतर्गत गट ड पदांच्या भरतीसाठी अर्ज भरता येणार आहे. विशेष म्हणजे एनसीव्हीटीद्वारे मिळालेले अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र पात्र ठरणार आहे.
भारतीय रेल्वे अंतर्गत गट ड पदांच्या भरतीसाठी अधिसूचना २१ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मोहिमेत सहभागी होण्यास इच्छुक असलेले लोक आरआरबी अर्जाच्या अधिकृत वेबसाईटद्वारे त्यांचे ऑनलाईन अर्ज भरू शकतात, जे अर्ज https://rrbapply.gov. in/ येथे उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची वेळ २३ जानेवारी २०२५ ते २२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान उपलब्ध असणार आहे. तर इच्छुक उमेदवार आपला तपशील देऊन, कागदपत्रे जोडून आणि शुल्क भरून अर्ज करू शकणार आहेत.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.