ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
शिर्डी

नेवासा – शिर्डी हे जागतिक कीर्तीचे देवस्थान असून दररोज हजारो साईभक्तांची वर्दळ असणाऱ्या मुख्य रस्त्यावर नुकतीच घडलेली दुहेरी हत्त्याकांडाची घटना म्हणजे श्री साईबाबांच्या पवित्र शिर्डीला डागळणारी असून वाढत्या गुन्हेगारीवर केंद्र सरकारचे लक्ष वेधणार असल्याची प्रतिक्रिया शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केली.दिल्ली येथे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असून खा.वाकचौरे दिल्लीला असताना शिर्डीतील दुहेरी हत्ताकांडाची माहिती मिळताच आपली पहिली प्रतिक्रिया देत हळहळ व्यक्त केली. तात्काळ अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून माहिती घेत शिर्डीत धडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात. शिर्डीत अवैध धंद्यामुळे वारंवार असे प्रकार घडत असून प्रशासनाने आता कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे.

शिर्डी

साईभक्तांची फसवणूक करून मिळवलेल्या पैशातून प्रचंड व्यसनाधीनता वाढली असून त्यातून असे प्रकार घडतात आणि निष्पाप व्यक्तींचा बळी जातो. याबाबत लवकरच पोलीस प्रशासन, शिर्डी नगरपंचायत व साईबाबा संस्थानचे वरिष्ठ अधिकारी यांची तातडीची बैठक घेऊन आवश्यक त्या कठोर उपाययोजना करणेबाबत निर्देशीत करणार आहे. यासाठी आवश्यकता भासल्यास श्री साईंच्या मंदिर परिसरात केंद्राच्या अतिरिक्त सुरक्षा पथकाची नियुक्ती करणेबाबत तात्काळ केंद्रीय मंत्रीमहोदय यांना पत्राद्वारे सूचित करणार असल्याचे सांगितले.

शिर्डी

शिर्डीत पुरेसा रोजगार उपलब्ध नसल्याने अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढत चालला असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने याचा कायमस्वरूपी बिमोड करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही देत शेवटी चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा असा हिंसाचार आणि अत्याचार घडवतो असल्याची खंत व्यक्त केली. हत्त्याकांडातील दोन्हीही निष्पाप दिवंगत कर्मचारी हे साईबाबा संस्थानच्या सेवेत असल्याने त्यांच्याप्रति शोक व्यक्त करत परत अशा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडता कामा नये, याबाबत आम्ही अलर्ट झालो आहोत, याची ग्वाही दिली.

शिर्डी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिर्डी
शिर्डी
शिर्डी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिर्डी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!